पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या मृत्यूनंतर
पत्नीची आत्महत्या
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By

भिगवण, ता. १४ : डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिगवण (ता. पुरंदर) येथे घडली. साक्षी ऊर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे (वय २०, रा. विवेकानंद नगर, भिगवण) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वीटभट्टीसाठी माती आणली जात असताना वीटभट्टी मालक ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे यांचा गुरुवारी (ता. १२) पहाटे डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. साक्षी ही ज्ञानेश्वर याची पत्नी होती. त्यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पतीच्या आकस्मिक निधनाचा साक्षी हिस धक्का बसला होता पतीच्या निधनाच्या धक्क्यातून विवाहितेने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00074 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top