भिगवण स्टेशन येथे दोन गटांत वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवण स्टेशन येथे दोन गटांत वाद
भिगवण स्टेशन येथे दोन गटांत वाद

भिगवण स्टेशन येथे दोन गटांत वाद

sakal_logo
By

भिगवण, ता. १९ ः भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथे क्रिकेटचा बॉल हद्दीमध्ये आल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. याप्रकरणात दाखल फिर्यादीवरून दोन्ही बाजूंच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.
सचिन प्रवीण कांबळे (वय ३७, रा. भिगवण स्टेशन, ता.इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे चुलते बांधकामाच्या बाजूला सारखा बॉल मारू नका असे म्हणाले असता चिडून जाऊन खौजा हसन कुरेशी, तैशीब कुरेशी, सदाम कुरेशी, सोहेल कुरेशी, जुनेत कुरेशी (रा. सर्व भिगवण स्टेशन) यांनी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. अजहर खाजा कुरेशी (वय ३२, रा. भिगवण स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा पुतण्या जुनेत कुरेशी यास क्रिकेट खेळताना आरोपींच्या बांधकाम सुरु असलेल्या जागेमध्ये बॉल गेल्याच्या कारणावरून राजेंद्र कांबळे, सचिन कांबळे, विशाल प्रभाकर खडके, अक्षय राजेंद्र कांबळे, प्रेमचंद कांबळे, गणेश विठ्ठल खडके यांनी शिवीगाळ केली, तसेच फिर्यादीच्या खिशातील १२ हजार पाचशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. अधिक तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस हवालदार दत्तात्रेय खुटाळे करीत आहेत.