
योगेश्वरी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
भिगवण, ता. २ : डिकसळ (ता. इंदापूर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. पी. राऊत यांनी जाहीर केले.
या संस्थेची स्थापना सन १९६० मध्ये झाली. मागील साठ वर्षामध्ये संस्थेच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र, यावेळी संचालकपदाच्या १३ जागांसाठी १७ अर्ज आले होते. त्यामुळे निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. १७ पैकी एक अर्ज छाननीमध्ये बाद झाला, तर इतर तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध संचालक- सर्वसाधारण गट- विजयकुमार गायकवाड, आबासाहेब हगारे, संतोष हगारे, तानाजी सूर्यवंशी, कैलास कुंभार, जिजाराम पोंदकुले, सतीश काळे, अशोक पवार. अनुसूचित जाती-जमाती- रावसाहेब
गवळी, विजा/भज प्रवर्ग- धनुलाल पोंदकुले, इतर मागासवर्ग- लहू भोंग, महिला राखीव- जयश्री हगारे, नयना भोसले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00081 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..