वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा
वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा

वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे मूक मोर्चा

sakal_logo
By

भिगवण, ता.१३ : येथील मुस्लिम समाजाच्या वतीने वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १३) मूक मोर्चा काढण्यात आला. दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भिगवण व परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने शिस्तबद्ध व शांततामय मार्गाने पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येथील मस्जिद येथून मूक मोर्चा सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, मेन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भैरवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यामार्गे पोलिस स्टेशनपर्यंत काढण्यात आला.

मूक मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिगवण पोलिस स्टेशनकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाज बांधव, सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

00091

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00085 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top