इंदापूर तालुक्यामधील तलाव भरण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुक्यामधील तलाव भरण्याची मागणी
इंदापूर तालुक्यामधील तलाव भरण्याची मागणी

इंदापूर तालुक्यामधील तलाव भरण्याची मागणी

sakal_logo
By

भिगवण, ता. १४ : मदनवाडी ते तरंगवाडीसह इंदापूर तालुक्यातील १९ तलाव भरण्याची मागणी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. खडकवासला प्रकल्प कार्यकारी अभियंता यांनी मान्यता दिली असून तातडीने कालव्याद्वारे तलाव भरण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

सध्या राज्याच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस सुरु असला तरीही इंदापूर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही. इंदापूरच्या एका बाजूला नीरा तर दुसऱ्या बाजूला भीमा नदी आहे. या दोन्ही नद्यांच्या मधल्या भागांमधील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान १९ पाझर तलावांची निर्मिती केली आहे. या तलावांमध्ये खडकवासला कालव्याच्या माध्यमतून पाणी सोडण्यात येते. बऱ्याच वेळा योग्य नियोजनाअभावी तलावात पाणी सोडले जात नसल्यामुळे तलावावर अवलंबून शेतकऱ्यांना फटका बसतो. सध्या खडकवासला धरण परिसरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे व धरण शंभर टक्के भरले असून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यातील १९ पाझर तलाव भरणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00107 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top