स्वामी चिंचोली येथे नीट परिक्षा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी चिंचोली येथे नीट परिक्षा सुरळीत
स्वामी चिंचोली येथे नीट परिक्षा सुरळीत

स्वामी चिंचोली येथे नीट परिक्षा सुरळीत

sakal_logo
By

भिगवण, ता. २१ : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परिक्षा स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथील परिक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. ग्रामीण भागातील ९३६ विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र देण्यात आले होते. त्यापैकी ८४१ विद्यार्थ्यांनी येथे परिक्षा दिली. तर ९५ विद्यार्थी परिक्षेस अनुपस्थित राहिले. तीन वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी या हेतुने दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये नीट परिक्षेचे केंद्र देण्यात आले. या वर्षी केंद्रामध्ये परिक्षेसाठी पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील ९३६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. बरेचसे विद्यार्थी बाहेर गावचे असल्याने परिक्षार्थींबरोबर पालकही परिक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित होते. परिक्षेसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, सचिव प्रा. माया झोळ, केंद्र संचालक दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या नंदा ताटे, बाह्य परिक्षक संदीप पाटील, विलास मानकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00108 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..