‘सोमेश्वर टेक्नोथाॅन २०२२’ मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट स्कूलचे दुहेरी यश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्वर  टेक्नोथाॅन २०२२’ मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट स्कूलचे दुहेरी यश!
‘सोमेश्वर टेक्नोथाॅन २०२२’ मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट स्कूलचे दुहेरी यश!

‘सोमेश्वर टेक्नोथाॅन २०२२’ मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बिल्ट स्कूलचे दुहेरी यश!

sakal_logo
By

भिगवण, ता. २८ : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ‘सोमेश्वर टेक्नोथॉन २०२२’ राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये भादलवाडी इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान बिल्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक गटामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम आणि चतुर्थ क्रमांक पटकावीत नेत्रदीपक कामगिरी बजावली.
या दोन्हीही गटांचे विषय अनुक्रमे आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान आणि केळीच्या झाडाच्या खोडापासून पर्यावरण पूरक कागद बनवणे असे होते. दोन्ही गटात अनुक्रमे अनुष्का सोलनकर, आर्यन मोरे, गुरुराज मोरे, प्रेरणा जगताप आणि वैष्णवी जाधव, अनिकेत चौगुला, ओम कन्हेरकर,तनिशी शर्मा या मुलांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी अभिरुची निर्माण करणे, चिकित्सक वृत्ती जोपासणे या कार्यक्रमाचा हेतू होता. यासाठी प्राचार्या सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेखा जाधव, पल्लवी गवळी, सोनम गवळी, सोनाली ढवळे, अक्षता बावळे आणि अश्विनी वाघ या शिक्षकांनी सहकार्य केले. विद्या प्रतिष्ठानच्या व्यवस्थापन समितीने सर्वांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00114 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..