भिगवण पोलिस ठाण्याभोवती विद्युत रोषणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवण पोलिस ठाण्याभोवती विद्युत रोषणाई
भिगवण पोलिस ठाण्याभोवती विद्युत रोषणाई

भिगवण पोलिस ठाण्याभोवती विद्युत रोषणाई

sakal_logo
By

भिगवण, ता. १४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने रॅली, देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील भिगवण पोलिस ठाण्याभोवती आकर्षक तिरंगी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येथील विविध शाळांमधील विद्यार्थी, भिगवण पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस पाटील व रोटरी क्लब, सायकल क्लब, नेचर क्लब आदी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस यांनी गावांमधून राष्ट्र ध्वजासह प्रभात फेरी काढली. यावेळी सैनिकांच्या वेशातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रभात फेरीनंतर येथील श्याम गार्डन येथे राष्ट्रभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते व पथनाट्य सादर केली. मुली, महिला व विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती व्हावी व समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी पोलिस ठाणे भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस, रूपेश कदम, सहाय्यक फौजदार नाना वीर, पोलिस हवालदार सचिन पवार, महेश उगले, इन्कलाब पठाण व भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी केले.
BHN22B00157,

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00126 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..