भिगवणला पाणी योजनेच्या श्रेयाची लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवणला पाणी योजनेच्या श्रेयाची लढाई
भिगवणला पाणी योजनेच्या श्रेयाची लढाई

भिगवणला पाणी योजनेच्या श्रेयाची लढाई

sakal_logo
By

भिगवण, ता. १ : इंदापूर तालुक्यातील भिगवण पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत २९ कोटी ७५ लाख ३१ हजार आठशे रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. मात्र, योजना मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे.
भिगवण येथील पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत २९ कोटी ७५ लाख ३१ हजार आठशे रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मंजूर झाल्याचे भाजपप्रणित सत्ताधारी गटाने सांगताच विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसही आक्रमक झाल्याचे येथे पहावसयास मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम बैठक व नंतर
येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित पॅनेल सत्तेत असताना पाठविला होता. त्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. त्यामुळे योजना मंजुरीचे श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेस व भरणे यांना जाते, अशी भूमिका मांडली आहे. ग्रामसभेमध्ये पाणी पुरवठा योजनेवरुन भाजप व राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.
उजनी धरण उशाला असतानाही अनेक वर्षे भिगवणकरांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. जलजीवन मिशन अंतर्गत मिळालेल्या भरघोस निधीतून भिगवणकरांची तहान भागणार आहे. त्यामुळे योजनेच्या श्रेयावरुन सत्ताधारी व विरोधक यांनी वादविवाद करण्याऐवजी योजना दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन भिगवणकरांची तहान भागविण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पाणी प्रश्‍न सुटल्यास विकास
भिगवण गाव तीन जिल्हा व सहा तालुक्यांच्या सीमारेषेवर आहे. येथील आंतरराष्ट्रीय बिल्ट कागद प्रकल्प, जवळच असलेल्या खडकी येथील वेंकटेश्वरा हॅचरीजचा प्रकल्प, दत्तकला शिक्षण संस्थेचे के.जी. टु पी.जी. पर्यंतचे अभियांत्रिकी, औषधनिर्माण क्षेत्रातील शैक्षणिक संकुल, उजनी धरणांमुळे मासळीची बाजार पेठ, हॉटेल व्यवसाय, सुमारे पन्नास दवाखाने व मोठे व्यावसायिक केंद्र असतानाही केवळ पाण्याच्या समस्येमुळे नागरिक भिगवणपेक्षा बारामतीला राहणे पसंत करतात. येथील पाणी सुटल्यास येथील नागरिकरणामध्ये वाढ होऊन गावाच्या विकासाला हातभार लागू शकतो.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00138 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..