भादलवाडीत तरुणावर विनयभंगप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भादलवाडीत तरुणावर
विनयभंगप्रकरणी गुन्हा
भादलवाडीत तरुणावर विनयभंगप्रकरणी गुन्हा

भादलवाडीत तरुणावर विनयभंगप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

भिगवण, ता. १ : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील शाळेमध्ये जाण्यासाठी बसथांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या मुलीला गाडीवर बसण्यास भाग पाडून अज्ञातस्थळी नेऊन मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करून विनयभंग केले. या प्रकरणी धिरज भंडलकर (वय २३, रा. भादलवाडी) याच्याविरूद्ध अपहरण, छेडछाड व बाललैंगिक अत्याचार अपराध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, पीडित मुलगी पळसदेव येथील विद्यालयामध्ये जाण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) सकाळी भादलवाडी येथे बस थांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. तेथे आरोपी मोटारसायकलवरून (क्रमांक माहीत नाही) येऊन, ‘तु एकटी इथे काय करते? का उभा राहिली आहे?’ असे म्हणून त्याच्या दुचाकीवर बसवून शाळेसाठी पळसदेव येथे न सोडता भिगवण, पाटस, कुरकुंभमार्गे यवत येथे डोंगरावर नेऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00140 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..