भिगवण येथील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवण येथील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी
भिगवण येथील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

भिगवण येथील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

sakal_logo
By

भिगवण, ता. १० ः वरुण राजाच्या साथीने ढोल ताशा व डिजेच्या तालावर भिगवणकरांनी लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. सावर्जनिक गणेश उत्सव मंडळांनी स्वयंशिस्तीने पाळलेली आचारसंहिता व येथील पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या चोख नियोजनामुळे येथील विसर्जनाची मिरवणुक शांततेत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. भिगवण पोलिस ठाणे व भिगवण ग्रामपंचायतीनी काढलेल्या विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.
भिगवण गावांमध्ये सुमारे २६ तसेच भिगवण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील पंधरा गावांमध्ये ७२ सावर्जनिक गणेश मंडळानी व हजारो गणेश भक्तांनी गणेश उत्सव उत्साहात साजरा केला. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी स्वयंस्फूर्तीने माफक गुलालाचा वापर करत पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणुका काढल्या. दुपारपर्यंत वैयक्तिक गणेश भक्तांनी मूर्ती विसर्जित केल्या. तर त्यानंतर सावर्जनिक गणेश उत्सव मंडळांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. येथील पोलिस ठाण्याच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. वाद्याच्या तालावर नृत्य करत पोलिसांनीही विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढली. त्याचबरोबर येथील श्रीनाथ तरुण मंडळ, सिद्धिविनायक मंडळ, स्वामी विवेकानंद मंडळ, जाणता राजा तरुण मंडळ, अखिल जे. के. मित्र मंडळ आदी प्रमुख मंडळांनी पारंपारिक पद्धतीने व माफक गुलालाचा उपयोग करत शांततेत विसर्जन मिरवणुका काढल्या. परिसरातील कुंभारगाव, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, म्हसोबाचीवाडी व निरगुडे येथे विसर्जन शांततेत करण्यात आले. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस, सहाय्यक फौजदार नाना वीर व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00148 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..