
पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तुषार क्षीरसागर
भिगवण, ता. २७ : (ता. इंदापूर) येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. तुषार क्षीरसागर यांची तर, सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची निवड झाली. येथील हॉटेल ज्योती व्हेज येथे नुकताच नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे होते तर, पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस-पाटील हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिसाळ, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत चवरे, प्रहार संघटनेचे रमेश शितोळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ सावंत यांनी तर, सूत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी व आभार अरुण भोई यांनी मानले. प्रा. तुषार वाबळे, विजय कुताळ, सागर घरत, सचिन राजेभोसले, विठ्ठल मोघे, प्रा. सुनील नगरे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी : अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर, सचिव अप्पासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष महेंद्र काळे(इंदापूर), अतुल काळदाते(दौंड), खजिनदार आकाश पवार, कार्याध्यक्ष प्रा. सुरेंद्र शिरसट, जिल्हा प्रतिनिधी नारायण मोरे. सोशल मीडिया सेल कार्यकारिणी- अध्यक्ष सागर जगदाळे, उपाध्यक्ष पल्लवी चांदगुडे, सचिव अरुण भोई, कार्याध्यक्ष गणेश जराड, खजिनदार शैलेश परकाळे, जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड, समन्वयक संतोष सोनवणे.