शेटफळगढेला सावकारवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेटफळगढेला सावकारवर गुन्हा दाखल
शेटफळगढेला सावकारवर गुन्हा दाखल

शेटफळगढेला सावकारवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

भिगवण, ता. ९ : शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याकडून सावकरांने १३ लाख रुपयांचे २१ लाख रुपये वसुल केल्याची व सुरक्षेसाठी दिलेली जमीन परत मागितली असता सावकारांनेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद येथील शेतकऱ्यांने दाखल केली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भिगवण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली विलास शिरसाट (वय ३५), वसंत ज्ञानदेव राजपुरे (वय ५०), गणेश वसंत राजपुरे(वय २४), रवींद्र बाळासो शिरसट (वय ३५) रा. सर्व शेटफळगढे, ता.इंदापूर), प्रताप शिवाजीराव तावरे (वय ३५, रा. माळेगाव, ता.बारामती) यांचेविरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ व भारतीय दंड विधान ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्यादी प्रवीण दिलीप मुळीक(वय. ३० रा. शेटफळगढे, ता.इंदापूर) यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी यांनी आरोपीकडून आर्थिक अडचणीच्या कारणास्तव १३ लाख रुपये साडेतीन टक्के व्याजदराने घेतले होते. आरोपींनी सुरक्षेसाठी फिर्यादीकडुन गट नं. ४१ मधील ५५ गुंठे व गट नं. ५० मधील ४४ गुंठे जमीन खरेदीखत करून घेतली होती. फिर्यादीने मुद्दल व व्याजापोटी आरोपींना २१ लाख रुपये परत केल्यानंतर जमिनीची मागणी केली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांचे वडिलास शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

याचा अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जाधव करीत आहेत.