गोमांस वाहतुकीचा टेम्पो मदनवाडी येथे उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोमांस वाहतुकीचा टेम्पो
मदनवाडी येथे उलटला
गोमांस वाहतुकीचा टेम्पो मदनवाडी येथे उलटला

गोमांस वाहतुकीचा टेम्पो मदनवाडी येथे उलटला

sakal_logo
By

भिगवण, ता. २ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मदनवाडी (ता. इंदापूर) येथील ‘व्यंकटेश लॉन्स’समोर गोमांस वाहतूक करणारा भरधाव टेम्पो शुक्रवारी (ता. २) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुभाजकाला धडकून उलटला. याप्रकरणी पोलिसांनी अवैध गोमांस वाहतूक, विक्री व हयगयीने वाहन चालविल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मंदार संभाजी शिंदे यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुणे-सोलापूर महामार्गावरून भरधाव जाणार पिकअप (क्र. एमएच ०३ डीव्ही १७९९) दुभाजकावर आदळून उलटला. त्यामध्ये गाई, बैल यांचे सुमारे ८०० किलो मांस होते. अपघातानंतर पिकअप चालक पसार झाला. पोलिसांनी सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे गोमांस व सुमारे चार लाख रुपये किमतीचा पिकअप जप्त केला.