
भिगवण येथे ऊसतोड कामगारांना ब्लँकेट वाटप
भिगवण, ता. ०७ : येथील शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविदयालयाच्यावतीने सामाजिक भावनेतून ऊसतोडणी कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप केले. सामाजिक भावनेतून केलेल्या या मदतीबद्दल ऊस तोडणी कामगारांनी समाधान व्यक्त केले.
सध्या ऊसतोडणीचा हंगाम वेगात सुरु आहे. परिसरामध्ये ऊस तोडणी कामगार व त्यांची कुटुंबे थंडीचा सामना करतात. थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या ऊस तोडणी कामगारांना मायेची ऊब द्यावी या हेतुने येथे भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लॅंकेट वाटप उपक्रम राबविला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, प्रा.तुषार क्षीरसागर, डॉ. उज्वला लोणकर, अविनाश गायकवाड, संजय भरणे, अनिता गायकवाड, महेश लांबते, वंदना नारायणकर, शहाजी टेळे, रेश्मा आटोळे, प्रफुल साबळे, विकास आटोळे आदी उपस्थित होते.