Fri, Feb 3, 2023

भिगवण येथील अपघातात
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भिगवण येथील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Published on : 15 January 2023, 3:19 am
भिगवण, ता. १५ : येथील पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टँकर व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. १५) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अरुण नारायण लवटे (वय-४४, रा. कोर्टी ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण लवटे हे दुचाकीवरून पुण्यावरून मुळगाव कोर्टी या ठिकाणी आईच्या पुण्यतिथीसाठी निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील पुणे - सोलापूर महामार्गावर टँकर व दुचाकीस्वार यांच्यात अपघात झाला.
अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली व दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक टँकर जागेवरती सोडून पळून गेला. अधिक तपास भिगवण पोलिस करीत आहेत.