
शेटफळगढे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
भिगवण, ता. ३० ः शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.
अर्जुन ऊर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय. ४०, रा. शेटफळगढे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन ऊर्फ अजित रामभाऊ कुंभार यांनी शेटफळगढे येथील वडूजकर यांच्या शेतामध्ये असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन त्यास झाडावरून खाली घेऊन भिगवण ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अधिक तपास येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.