Sat, Sept 30, 2023

भादलवाडीत युवकाचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
भादलवाडीत युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Published on : 5 May 2023, 12:05 pm
भिगवण, ता. ५ : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शिवाजी मोहन कळसकर (वय ३६, रा. भादलवाडी, ता. इंदापूर), असे त्याचे नाव आहे.
याबाबत हरिश्चंद्र कळसकर यांनी भिगवण पोलिसांना माहिती दिली. शिवाजी यास घराजवळ असलेल्या वायरला चिकटल्यामुळे विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यास तातडीने येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद येथील भिगवण पोलिस ठाण्यात केली.