भिगवणमधील रस्त्यांसाठी ७५ लाखांचा निधी

भिगवणमधील रस्त्यांसाठी ७५ लाखांचा निधी

भिगवण, ता.१४ : माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यातून येथील भिगवण ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांसाठी नागरी सुविधाअंतर्गत ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सरपंच दिपिका तुषार क्षीरसागर यांनी दिली आहे.
भिगवण ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नागरी सुविधा अंतर्गत रस्त्याच्या कामासाठीचे प्रस्ताव पाठविले होते. कामाच्या मंजुरीसाठी सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, माजी सरपंच पराग जाधव, तानाजी वायसे, माजी उपसभापती संजय देहाडे, माजी उपसरपंच जयदीप जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून पाठपुरावा केला होता. अखेर माजी सहकारमंत्री व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यास यश आले असून, या रस्त्याच्या कामास ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र ग्रामपंचायत प्रशासनास प्राप्त झाले आहे. यामध्ये राजू मोतीकर घर ते अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ते दत्तू साठे घर रस्ता, आदर्श विद्या मंदिर ते राशीन रोड, स्मशान भूमी ते आर्या सिमेंट पाइप रस्ता, पिंटू गायकवाड घर ते संपत जमदाडे घर रस्ता, अमोल पाटील घर ते सर्विस रस्त्यापर्यंत, मत्रे वस्ती ते शिंग्रोबा माळ रस्ता, गुणवरे वस्ती परिसर रस्ता आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ते भिसे घर रस्ता आदी रस्त्यांसाठी एकूण ७५ लाख रुपये रस्ते मंजूर झाले आहेत.
दरम्यान सरपंच दिपिका क्षीरसागर म्हणाल्या, की भिगवण गावांमध्ये स्थानिकांसह आसपासच्या तालुक्यातील लोक ये-जा करत असतात. गावातील प्रमुख रस्त्यांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे गावाचे रुपडे बदलण्यास यामुळे मदत होणार आहे. निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com