स्वामी चिंचोली येथील दत्तकला कॉलेजमध्ये ‘इंडक्शन’ कार्यक्रम

स्वामी चिंचोली येथील दत्तकला 
कॉलेजमध्ये ‘इंडक्शन’ कार्यक्रम
Published on

भिगवण, ता. ७ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. नवीन विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमांमध्ये रंग भरला.
फार्मसी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्षे २०२४-२५मध्ये प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुरकुंभ (ता. दौंड) येथील सिपला कंपनीचे व्यवस्थापक राधेश्याम पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ व डॉ. विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एच.डी.जेडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राधेश्याम पाटील म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास व आनंद यांचा योग्य समन्वय राखला पाहिजे, तर जीवनामध्ये यश मिळते.’’ डॉ. ज्ञानेश्वर गाढवे यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाविषयी तर प्रा. राम निखाते यांनी, परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com