‘राजगड’च्या निवडणुकीसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राजगड’च्या निवडणुकीसाठी आज मतदान
‘राजगड’च्या निवडणुकीसाठी आज मतदान

‘राजगड’च्या निवडणुकीसाठी आज मतदान

sakal_logo
By

भोर, ता. २८ ः अनंतनगर-निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.२९) मतदान होणार आहे. कारखान्याच्या तीन गटांमधील संचालकपदांच्या ७ जागांसाठी ११ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

यापूर्वीच १० संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. भोर, वेल्हे व खंडाळा (जि.सातारा) तालुक्यातील २९ मतदानकेंद्रांवर १३ हजार ६१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रीया पार पडणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी २३४ कर्मचाऱ्यांची तर बंदोबस्तासाठी ४६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवारी (ता.२८) भोरमधील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधून सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी व मतदानाचे साहित्य पोचविण्यात आले. निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या ११ उमेदवारांमध्ये ७ सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे, ३ राष्ट्रवादीचे आणि १ भाजपचा उमेदवार आहे. बिनविरोध झालेले सर्वच्या सर्व १० उमेदवार हे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आहेत. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी (ता.३१) सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. शिरवळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर २८ गावांमधील सर्वाधिक ७११ मतदार मतदान करणार आहेत. वेल्हे येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर २३ गावांमधील सर्वात कमी २५० मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गटानुसार निवडणुकीतील उमेदवार पुढीलप्रमाणे ः गट क्र. १ भोर देवपाल (२ जागा) - रामचंद्र पर्वती कुडले (राष्ट्रवादी), सुभाष मारुती कोंढाळकर (कॉँग्रेस), उत्तम नामदेव थोपटे (कॉँग्रेस). गट क्रमांक २ येवली-हातवे बु (३ जागा) - सुधीर चिंतामण खोपडे(काँग्रेस), पंडित रघुनाथ बाठे (राष्ट्रवादी), विलास अमृतराव बांदल (भाजप), सोमनाथ गणपत वचकल (कॉग्रेस), पोपटराव नारायण सुके (कॉँग्रेस). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत (२ जागा) - रामदास किसन गायकवाड(राष्ट्रवादी), दिनकर सोनबा धरपाळे(कॉग्रेस), प्रताप धोंडीबा शिळीमकर(कॉँग्रेस).

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00243 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top