वणव्यामुळे वरंधा घाटातील निसर्गसंपदा धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वणव्यामुळे वरंधा घाटातील निसर्गसंपदा धोक्यात
वणव्यामुळे वरंधा घाटातील निसर्गसंपदा धोक्यात

वणव्यामुळे वरंधा घाटातील निसर्गसंपदा धोक्यात

sakal_logo
By

भोर, ता. २९ ः भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात सुरु असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. शिवाय घाटाचे निसर्गसौंदर्यही खराब होत आहे. अतिवृष्टीनंतर वरंधा घाटातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. दररोज शेकडो पर्यटक घाटातून महाडकडे जात आहेत. काही पर्यटक रस्त्याच्या कडेला मद्यपान व धूम्रपान करीत थांबतात. धूम्रपान केल्यानंतर बिडी किंवा सिगारेट न विझवता तसेच टाकतात. त्यामुळे वणवे लागतात. याशिवाय काही ग्रामस्थ आपल्या खासगी जागेतील गवत जाळतात. परंतु, झाडे-झुडपे जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नाही आणि त्यामुळेही काही प्रमाणात वणवे लागत आहेत.
वरंधा घाटात झाडे, वेली, मोठ-मोठे वृक्ष आणि झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वणवा लागला तर कित्येक तास आणि कित्येक दिवस थांबत नाही. झाडे वेली हिरवी असल्याने अनेक दिवस वणव्यातून धूर येत राहतो. परंतु, त्यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होते. आंबे, करवंदे, जांभूळ, आळू, हिरडा व इतर औषधी वनस्पती जळून खाक होतात. याशिवाय साप, घोरपड, सरडे, किडामुंगी, कीटकही मोठ्या प्रमाणात मृत पावतात. वरंधा घाटातील जंगलात व डोंगरदऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे पक्षी व प्राणी आहेत. यामध्ये मोर, लांडोर, कबुतरे, कावळे, चिमणी आदी प्रमुख पक्षांबरोबर ससे, कोल्हे, गवे, तरस, रानमांजरे, माकडे, हरिण, भेकर आणि बिबट्या आदी प्राण्यांचा समावेश आहे.
वनव्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पोहोचण्यास उशीर होतो. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरते. तीन वर्षांपूर्वी वणवा विझवताना एका वन कर्मचाऱ्याचा भाजून मृत्यू झाला होता. यामुळे वणवे लागून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

वनसंरक्षण समिती नावापुरतीच
वन विभागाच्या वतीने गावोगावी वन संरक्षण समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीमार्फत वणवे न लावण्याबाबत कोणतीही जनजागृती केली जात नाही. यामुळे या समित्या फक्त नावापुरत्याच राहिल्या आहेत. वन विभागाकडून अनेक महिलांना सबसिडी देवून गॅस कनेक्शनही दिले आहे.

0417

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00244 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top