बालवडी ग्रामपंचायतीतर्फे महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालवडी ग्रामपंचायतीतर्फे 
महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट
बालवडी ग्रामपंचायतीतर्फे महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट

बालवडी ग्रामपंचायतीतर्फे महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट

sakal_logo
By

भोर, ता. ५ ः बालवडी (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व महिला व तरुणींना इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय वर्षभर मुलींना व महिलांना इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन मिळण्याची सोय केली. ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या महिला आरोग्य मार्गदर्शन मेळाव्यात सरपंच सुवर्णा विजय किंद्रे यांच्या हस्ते महिलांना इको फ्रेंडली नॅपकिन देण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्या मंजुश्री अतुल किंद्रे यांनी ग्रामपंचायतीमार्फत गावातील किशोरवयीन मुलींच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. त्यास सरपंच सुवर्णा किंद्रे, उपसरपंच मच्छिंद्र फणसे यांच्यासह सर्व सदस्यांनी होकार दर्शविला. महिलांसाठी दर महिन्याला आवश्यक असलेले इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याचा विचार करण्यात आला. त्यानुसार गावातील 300 महिला व मुलींना इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यामध्ये भोरमधील रोबोकॉब कॉम्प्युटर्सच्या स्री स्वाभिमान योजनेच्या इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पाच्या प्रमुख प्रा. दीपाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. यापुढे गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध केले जाणार असल्याचे सरपंच सुवर्णा किंद्रे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या भारती किशोर किंद्रे, अस्मिता रामचंद्र किंद्रे, वैशाली तुषार किंद्रे, अर्चना सुरेश शिंदे, शीतल मच्छिंद्र किंद्रे, अंगणवाडी सेविका वैशाली भरत भोसले, आरोग्य विभागाच्या आशा वर्कर निशा संतोष किंद्रे, भारती सतीश किंद्रे, ग्रामपंचायतीमधील ऑपरेटर अलका शिवाजी शिंदे आदींसह ग्रामविकास अधिकारी अमोल गुत्ते उपस्थित होते.
0445

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00259 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top