किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य
किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य
किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य

किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य किकवीत विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना भोजनाचे साहित्य

sakal_logo
By

भोर, ता. २१ः किकवी-केंजळ (ता.भोर) येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान व विघ्नहर्ता पतसंस्थेमार्फत पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या तालुक्यातील वारक-यांच्या दिंड्यांना भोजनाचे साहित्य मोफत देण्यात आले. तालुक्याच्या पूर्वेकडच्या भागातील वाठारहिंगे, न्हावी ३२२, भोंगवली, भांबवडे, राजापूर, वागजवाडी पंचक्रोशी, कापूरहोळ पंचक्रोशी, कामथडी, कासुर्डी गु.मा. या गावांमधील दिंड्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.

भोजन साहित्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, मसाले, पापड, तेल, मीठ व साखर आदी प्रमुख साहित्यांचा समावेश आहे. किकवी येथील विघ्नहर्ता पतसंस्थेमध्ये घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या हस्ते भोजनसाहित्य संबंधित दिंडींच्या प्रमुखांकडे सुपूर्त करण्यात आले. विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थेचे सचिव काळूराम महांगरे, अंकुश चव्हाण, सुरेश काकडे, सुरेश हिंगे, गणेश मोरे, रमेश बोबडे, प्रकाश इंगुळकर, दिलीप बाठे व पंढरीनाथ भालेघरे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या २३ वर्षांपासून विघ्नहर्ता प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी गौरव व गरजूंना शिक्षणासाठी मदत, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबवीत आहे.

00518

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00293 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top