अतिवृष्टीग्रस्त भाग : भोरमधील डोंगराळ परिसरातील १३ गावांचा समावेश नागरिकांना आगाऊ धान्यवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीग्रस्त भाग : भोरमधील डोंगराळ परिसरातील १३ गावांचा समावेश
नागरिकांना आगाऊ धान्यवाटप
अतिवृष्टीग्रस्त भाग : भोरमधील डोंगराळ परिसरातील १३ गावांचा समावेश नागरिकांना आगाऊ धान्यवाटप

अतिवृष्टीग्रस्त भाग : भोरमधील डोंगराळ परिसरातील १३ गावांचा समावेश नागरिकांना आगाऊ धान्यवाटप

sakal_logo
By

भोर, ता. २५ : तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ क्षेत्रात असलेल्या १३ गावांमधील नागरिकांना पुढील दोन महिन्यांचे रेशनकार्डवर मिळणारे अन्नधान्य आगाऊ देण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, पूर येणे आणि रस्ते बंद होणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे दळणवळणाची साधने बंद पडतात. अशा परिस्थितीत ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावांमधील नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गतधान्य पुरवठा करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा १३ गावांतील लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा धान्यकोटा आगाऊ देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रती महिना प्रती माणशी २ किलो गहू २ रुपये प्रती किलो दराने व तांदूळ प्रती महिना प्रती माणशी ३ रुपये प्रती किलो दराने देण्यात येतो. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत वाटप करण्यात येणारे प्रती महिना प्रती माणशी १ किलो गहू व प्रती महिना प्रती माणसी ४ किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांकरिता दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रती महिना प्रती कार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रती किलो दराने व प्रती महिना प्रती कार्ड २० किलो तांदूळ ३ रुपये प्रती किलो दराने जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे वाटप करण्यात येणार आहे. या १३ गावांतील नागरिकांसाठी शासनाकडून २८१ क्विंटल गहू आणि ८१७ क्विंटल तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. अतिवृष्टी प्रवणग्रस्त या गावांतील नागरिकांनी आपल्या रेशन दुकानदारांकडून जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य घेऊन जावे, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

या गावांना मिळणार लाभ
तालुक्याच्या हिर्डोशी खोऱ्यातील शिळिंब, शिरवली हिमा, दापकेघर, गुढे, हिर्डोशी, दुर्गाडी, निवगण, माझेरी, शिरगाव, वारखंड, कुडली, कुंबळे व वेल्हे तालुक्यातील कर्नवडी अशा १३ गावांतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00302 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top