
भोरच्या दुर्गम भागातील २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
भोर, ता. ३ : टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्याच्या हिर्डोशी आणि आंबवडे खोऱ्यातील ७५० विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच पालकत्व स्वीकारलेल्या २५ विद्यार्थ्यांना सव्वा लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
शैक्षणीक साहित्यामध्ये सॅक, वह्या, पॅड, कंपास, पेन्सील, पाण्याची बाटली आणि पुस्तकांचा समावेश आहे. ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने ‘वंचित शिक्षण व समाज
विकास प्रकल्प’ या उपक्रमाअंतर्गत टिटेघरमधील समाजमंदिरात या साहित्याचे वाटप केले. मराठीतील सोशल मिडीयावरील चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजच्या कलाकारांच्या हस्ते या साहित्याचे आणि शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. वेब सिरीजमधील भरत शिंदे, रामदास जगताप व सुभाष मदने यांच्यासह ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर, मनिषा केळकर, टिटेघरचे सरपंच शंकर तावरे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा नवघणे, संतोष ढवळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल देशमाने, जयवंत जाधव, हनुमंत शिंदे, संकेत केळकर आदी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ७५० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00310 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..