पावसाळ्यातील पर्यटनासाठी रायरेश्र्वर किल्ल्यास पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यातील पर्यटनासाठी रायरेश्र्वर किल्ल्यास पसंती
पावसाळ्यातील पर्यटनासाठी रायरेश्र्वर किल्ल्यास पसंती

पावसाळ्यातील पर्यटनासाठी रायरेश्र्वर किल्ल्यास पसंती

sakal_logo
By

भोर, ता.२१ : महिलांसाठी सुरक्षित पर्यटन स्थळ आणि मुलांनाही ट्रेकिंगसाठी सोपा असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी सुरू झाली आहे. पुणे-मुंबईतील अनेक पर्यटक सहकुटुंब पावसाळी पर्यटनासाठी रायेश्र्वर किल्ल्यास पसंती देत आहेत.

रायरेश्वरावर मद्यपान आणि मांसाहार केला जात नसल्यामुळे महिला ट्रेकर्सची संख्या सर्वाधिक असते. सध्या वरंधा घाटात पर्यटनासाठी बंदी असल्यामुळे अनेक हौशी पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी आपला मोर्चा रायरेश्वर किल्ल्याकडे वळविला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटन रायरेश्वराला भेट देत आहेत. पावसाळ्यात किल्ल्यावर हिरवेगार गवत, घोंगावणारा वारा, गडद धुके, विविध रंगांची मनमोहन फुले आणि सह्याद्रीच्या डोंगरंगावरून कोसळणारे धबधबे पाहून स्वर्गाचा आनंद मिळत असल्याची भावना पर्यटकांच्या मनात येते. किल्ल्यावर गावरान पद्धतीचे शाकाहारी जेवण मिळत असल्यामुळे पर्यटकांच्या मनात अधिक आनंद होत आहे.

00595

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00328 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..