भोरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
भोरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

भोरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

sakal_logo
By

भोर, ता. ३० : शहर आणि तालुक्यात शुक्रवार (ता. २९) दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसात ढगांच्या गडगडाटाने आणि विजेच्या कडकडाटाने नागरिकांमध्ये घबराट पसरली. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. शुक्रवारी सकाळी वातावरण स्वच्छ झाले आणि कडक ऊन पडले. सकाळी नऊ वाजल्यानंतर उन्हामुळे घामाच्या धारा वाहू लागला. परंतु दुपारी तीन नंतर फोन गायब झाले आणि आकाशात काळे जमा झाले. दुपारी साडेतीननंतर सरी येण्यास सुरुवात झाली. मात्र चारच्या सुमारास आकाशात विजेचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00360 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top