अंबाडखींड घाटात दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाडखींड घाटात दरड कोसळली
अंबाडखींड घाटात दरड कोसळली

अंबाडखींड घाटात दरड कोसळली

sakal_logo
By

भोर, ता. ९ : भोर-मांढरदेवी मार्गावरील अंबाडखींड घाटातील एका मोठ्या वळणार मंगळवारी (ता.९) सकाळी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठमोठे दगड आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला.
तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अंबाडेमधील मनोज खोपडे, सोपान खोपडे यांच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश जाधवर यांच्यासह कर्मचा-यांनी रस्त्यावरील छोटे दगडमाती बाजूला केली. त्यामुळे दुचाकी व इतर छोट्या जाण्यास सुरुवात झाली. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील दगडमाती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
पुण्या-मुंबईहून महाबळेश्वर, वाई, पाचगणी येथे भोरमार्गे जाताना निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. डोंगरांमधील दाट धुके, धबधब्यांचा आणि वाऱ्याचा घोंगावनारा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हवेतील गारवा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या मार्गाचा अवलंब करतात. दरम्यान, पर्यटकांनी डोंगरांमधून जाताना विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो घाटातील प्रवास टाळावा, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00693

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00374 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..