पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Avari and Venubai Avari
पतीच्या निधना नंतर पत्नीनेही सोडले प्राण

पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडले प्राण

भोर - नेरे (ता. भोर) येथे पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीनेही प्राण सोडल्याची घडली. बाळासाहेब गणपती आवारी (वय ९०) आणि त्यांच्या पत्नी वेणुबाई बाळासाहेब आवारी (वय ८५) अशी मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत.

बुधवारी (ता.१०) सकाळी सात वाजता बाळासाहेब आवारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची पत्नी वेणुबाई यांना त्यांच्या निधनाचा धक्का बसला. ग्रामस्थांनी बाळासाहेब यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु केली. त्यावेळी घरात शांतपणे पडून राहिलेल्या वेणुबाई यांचाही सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. ग्रामस्थांनी दोघांचीही अंत्ययात्रा एकाच वेळी काढली. बाळासाहेब आवारी यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. प्रगतशील शेतकरी तसेच विविध सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष व गावचे खजिनदार म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते. त्यांच्यामागे एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. आवारी दांपत्याच्या अंत्ययात्रेस शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मरेपर्यंत पत्नीचे पतीवरील प्रेम पाहून उपस्थितांचे डोळे पानावले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00378 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bhordeathwife and husband