भोरमध्ये रामबाग रस्त्यावरील चार दुकाने फोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमध्ये रामबाग रस्त्यावरील चार दुकाने फोडली
भोरमध्ये रामबाग रस्त्यावरील चार दुकाने फोडली

भोरमध्ये रामबाग रस्त्यावरील चार दुकाने फोडली

sakal_logo
By

भोर, ता. १० : भोर शहरात पुन्हा चोरीस सुरुवात झाली असून मंगळवारी (ता.९) रात्री रामबाग रस्त्यावरील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. सुदैवाने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. काही दुकानातून किरकोळ रोख रक्कमेसह, खाद्य पदार्थ, शेंगदाना लाडूच्या बरण्या चोरून नेल्या. मंगळवारी आठवडे बाजारानंतर रात्रीच्या वेळी ही दुकाने फोडण्यात आली. रामबाग परिसरात व्यावसायिकांची दुकाने व कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरातील
दिघे प्राईड हॉटेल, भेलके हाँटेल, हिरो होंडा शोरुम व एका पान टपरीच्या शटरची कुलपे तोडून शटर उचकटण्यात आली. बुधवारी (ता. १०) सकाळी व्यावसायिक दुकाने उघडण्यास गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. केवळ एकाच व्यावसायिकाने पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिस हवालदार यशवंत शिंदे पुढील तपास करीत आहेत. सद्यःस्थितीत जोराचा पाऊस असल्यामुळे आणि अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे भुरट्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी नागरिकांनी सावध आणि रात्रीच्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00380 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..