भाटघरच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाटघरच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
भाटघरच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

भाटघरच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

sakal_logo
By

भोर, ता. ११ : तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नीरा-देवघर व भाटघर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
तालुक्यातील नीरा-देवघर धरणाच्या क्षेत्रातील शिरगाव येथे सर्वाधिक ३ हजार ७११ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्याखालोखाल भाटघर धरण क्षेत्रातील भुतोंडे येथे ३ हजार १६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १३.७१ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणात सध्या ९२ टक्के तर ११.९२ टीएमसी पाणीसाठा असलेल्या नीरा-देवघर धरणात ८९ टक्के पाणीसाठा झालेला आहे. भाटघर धरणात बुधवारी (ता.१०) १ हजार ४७९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला आहे. तर नीरा-देवघर धरणात ७९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला आहे. सद्यःस्थितीत दोन्हीही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केलेला नाही. मात्र पाऊस सुरु राहिल्यास पुढील २४ ते ४८ तासांमध्ये भाटघर धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. तर तीन-चार दिवसांमध्ये नीरा-देवघर धरणही भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे स्वयंचलीत दरवाजे आपोआप सुरू होतील, आणि पाणीसाठ्यात वाढ होत राहिली तर इतर दरवाजेही उघडण्यात येतील, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
नीरा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून भोर-भोलावडेला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तालुक्यातील महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती आणि महसूल विभागाची पथके २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00707

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00381 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..