‘इकोफ्रेंडली पर्यटनासाठी प्रयत्न करणार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इकोफ्रेंडली पर्यटनासाठी प्रयत्न करणार’
‘इकोफ्रेंडली पर्यटनासाठी प्रयत्न करणार’

‘इकोफ्रेंडली पर्यटनासाठी प्रयत्न करणार’

sakal_logo
By

तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य अतिशय चांगले असून इकोफ्रेंडली पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. जिल्ह्याला दोन महिन्यांपासून पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनात इच्छुकांना गाइड प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या तांदळासाठी व बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांसाठी बाजारपेठ सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांना एसटीकडून योग्य सेवा मिळण्याबाबत आणि एसटीच्या अडचणी सोडविण्याबाबत पुढील आठवड्यात विशेष बैठका घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. नगरपालिकेला भरपूर निधी येऊनही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबतची माहिती घेऊन कामांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांनीच असल्याचेही सुळे यांनी नमूद केले. या आढावा बैठकीतील मुद्यांवर पुढील तीन महिन्यांनंतर पुन्हा फेरआढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आढावा बैठकीस प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहल देव आदी यावेळी उपस्थित होते.
ssociated Media Ids : BHR22B00778

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00411 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..