पत्नीच्या प्रियकरावर गुन्हेगाराचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या प्रियकरावर गुन्हेगाराचा हल्ला
पत्नीच्या प्रियकरावर गुन्हेगाराचा हल्ला

पत्नीच्या प्रियकरावर गुन्हेगाराचा हल्ला

sakal_logo
By

भोर, ता. २३ : भावेखल (ता.भोर) येथे कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगाराने पत्नीच्या प्रियकरावर हल्ला केल्याची घटना येथे घडली. ज्ञानेश्वर मारुती तावरे (वय ३२, रा. अंगसुळे) असे हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने अंकुश ज्ञानोबा साळुंके (वय ३०, रा. अंगसुळे) याच्यावर विळ्याने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी अंकुशने मंगळवारी (ता.२३) पोलिसात फिर्याद दाखल केली.
अंकुशने त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. आरोपी ज्ञानेश्वर हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने मार्च महिन्यात महिलेचा विनयभंग करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी कारागृहात असल्यामुळे त्याची पत्नी मुलीसहित फिर्यादी अंकुश साळुंके याच्याकडे राहात होती. गेल्या महिन्यात १० तारखेला आरोपीने त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. त्यानंतर सोमवारी (ता.२२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर पुन्हा अंकुशच्या घरी गेला आणि शिवीगाळ करून हातातील विळ्याने त्याच्या डाव्या हातावर वार केला आणि तेथून पळून गेला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00412 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..