नेकलेस पॉइंट परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेकलेस पॉइंट परिसरात
अज्ञात महिलेचा मृतदेह
नेकलेस पॉइंट परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह

नेकलेस पॉइंट परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह

sakal_logo
By

भोर, ता. २७ : भोर-कापूरव्होळ मार्गावरील नेकलेस पॉईंटजवळ इंगवली (ता. भोर) गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (ता. २७) दुपारी आढळून आला.
याबाबत किकवी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी माहिती दिली की, इंगवली गावचे पोलिस पाटील गणेश कांबळे यांनी राजगड पोलिसांना याबाबत खबर दिली. या घटनेची माहिती मिळताच किकवी दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक नितीन खामगळ, हवालदार दिनेश गुंडगे, गणेश लडकत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेचे वय अंदाजे ६० वर्षे असून, अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज आणि काळ्या रंगाचा परकर घातलेला आहे. कानात कर्णफुले आणि हातात बांगड्या आहेत. मृतदेह २४ तासांपेक्षा जास्त वेळ पाण्यात राहिलेला असावा. संबंधित महिला नेकलेस पॉईंटजवळ पाय घसरून पाण्यात पडली असावी किंवा नीरा नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत कोणाला माहिती असल्यास राजगड पोलिस ठाण्याशी (क्रमांक ०२११३-२७२२३३) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिस हवालदार गणेश लडकत हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00418 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..