गोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोठ्याला आग लागून 
९ जनावरांचा मृत्यू
गोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू

गोठ्याला आग लागून ९ जनावरांचा मृत्यू

sakal_logo
By

भोर, ता. २९ : शहरातील पिराचा मळा परिसरातील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून बैल, गाय, वासरू व बकरे अशा एकूण ९ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून शेतकरी सुधीर चंद्रकांत तारू यांचे ९ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास तारू यांच्या गोठ्यातून धूर येऊ लागला आणि जनावरांच्या हंबरड्यांचा आवाज येऊ लागला. त्यांनी त्वरित गोठ्याकडे धाव घेतली. आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेचा आगीचा बंब आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आग विझविली. परंतु तोपर्यंत गोठ्यातील ९ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ४ म्हशी, एक बैल, २ बकरे, एक खोंड व एका वासराचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने रविवारी रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00423 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..