जळीतग्रस्त शेतकऱ्याला भाजपकडून आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीतग्रस्त शेतकऱ्याला 
भाजपकडून आर्थिक मदत
जळीतग्रस्त शेतकऱ्याला भाजपकडून आर्थिक मदत

जळीतग्रस्त शेतकऱ्याला भाजपकडून आर्थिक मदत

sakal_logo
By

भोर, ता. ३० : भोर शहरातील पिराचा मळा येथील गोठ्याला आग लागून १० लाखांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला भोर शहर भाजपच्या वतीने २१ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
पिराचा मळा येथील शेतकरी सुधीर चंद्रकांत तारू या शेतकऱ्याची ९ जनावरे शनिवारी (ता. २८) रात्री आगीत होरपळून मृत्यू पावली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मांडके यांनी सहकाऱ्यांसमवेत त्यांच्या गोठ्याला भेट दिली आणि आर्थिक मदत केली. यावेळी भाजपच्या महिलाध्यक्षा दीपाली शेटे, शहराध्यक्षा स्वाती गांधी, सतीश शेटे, पंकज खुर्द, कपिल दुसंगे, दत्तात्रेय झांजले, अमर ओसवाल, संतोष लोहोकरे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन मांडके यांनी २१ हजारांचा धनादेश सुधीर तारू यांच्याकडे सुपूर्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00424 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..