भाटघरच्या सात स्वयंचलित दरवाजांतून विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाटघरच्या सात स्वयंचलित दरवाजांतून विसर्ग
भाटघरच्या सात स्वयंचलित दरवाजांतून विसर्ग

भाटघरच्या सात स्वयंचलित दरवाजांतून विसर्ग

sakal_logo
By

भोर, ता. ३० : भाटघर धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांतून मंगळवारी (ता.३०) सायंकाळी विसर्ग सुरू झाला. सुमारे ५ हजार क्यूसेकने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे. भाटघर धरणाच्या भूतोंडे व वेळवंड-पांगारी खोऱ्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धरणातील पाण्याच्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातात आणि काही वेळानंतर पुन्हा बंद होतात. मात्र, पाणी पडण्याच्या वेळेत गणेशभक्तांना आनंदाची पर्वणी पहावयास मिळाली. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या आणि भोरमधून आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना पडणाऱ्या पाण्याच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.
गणेशाची प्रतिष्ठापना बुधवारी(ता.३१) असल्यामुळे मंगळवारी गणेशभक्तांची भोरमधून ये-जा सुरू झाली. पुण्या-मुंबईतून गावाकडे गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या आनंदात धरणाच्या दरवाजातून कोसळणाऱ्या पाण्यामुळे अधिक भर पडली. कित्येक गणेशभक्तांनी धरणाच्या खालच्या बाजूला गाड्या थांबवून धरणातून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला. अनेकांनी फोटो, सेल्फी आणि शूटिंगही केले.

00806

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00425 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..