अंबाडे जिल्हा परिषद शाळेस ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाडे जिल्हा परिषद शाळेस 
‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ प्रदान
अंबाडे जिल्हा परिषद शाळेस ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ प्रदान

अंबाडे जिल्हा परिषद शाळेस ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ प्रदान

sakal_logo
By

भोर, ता. १२ : तालुक्यातील अंबाडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस जिल्हा परिषदेचा ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील अल्पबचत भवन येथे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक शिवाजी खोपडे व सरपंच हेमलता खोपडे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार बाळा भेगडे, शरद बुट्टेपाटील, प्रदीप कंद, आशा बुचके, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, शिक्षक राजू कारभळ, खंडोबा घोलप, उज्जला भारती, तृप्ती वाघुलकर, मनोज खोपडे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, बापू जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.

अंबाडेच्या प्राथमिक शाळेचा दर्जा ‘अ’ प्लस असून, शाळेस यापूर्वी तालुका सभापती चषक, राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा आदी पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षकांबरोबर शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नामुळे शाळेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाल्याचे मुख्याध्यापक शिवाजी खोपडे व शिक्षकांनी सांगितले.
-----------------

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00440 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..