भोलावडे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोलावडे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
भोलावडे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

भोलावडे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

sakal_logo
By

भोर, ता. १७ : भोर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भोलावडे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ११ सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीस सत्ताधारी कॉंग्रेसच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेल या दोन गटांमध्ये सरळ लढत होणार आहे. भर पावसातही प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही पॅनेलकडून गावात रॅली काढण्यात आली.
या ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) मतदान होणार असून, २ हजार ३७३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सरपंचपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातून वैभव सत्यवान आवाळे व प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांच्यामध्ये लढत होणार आहे. आजपर्यंत भोलावडे ग्रुप ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. मागील काही महिन्यात भोलावडे ग्रामपंचायतीमधून किवत ही वेगळी ग्रामपंचायत झाली आहे. त्यामुळे विभाजनानंतर प्रथमच होणाऱ्या भोलावडे ग्रामपंचायतीमधील निवडणुकीची रंगत वाढली आहे. सदस्यांच्या ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. आतापर्यंत दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी गावातील घरे पिंजून काढली आहेत.
भोलावडेच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी आणि प्रभाग क्रमांक २ मधील बाळासाहेब कुंभार व ज्ञानेश्वर तारू या दोन उद्योजकांमधील लढत लक्षवेधी होणार आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष सत्ता वाचविण्यासाठी, तर विरोधक राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्यासाठी झटत आहेत.

श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग १- संदीप काळे, रूपाली दाभाडे, अलका आवाळे. प्रभाग २- तृप्ती शिंदे, बाळासाहेब कुंभार, रमेश आवाळे. प्रभाग ३- वैशाली आवाळे, मंदा खोपडे, शशिकांत शिंदे, प्रभाग ४- शुभांगी रणखांबे, दत्तात्रेय गावडे.
श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग १- मनोज मोरे, रंजना कुंभार, रेश्मा आवाळे. प्रभाग २- ज्ञानेश्वर तारू, प्रशांत पडवळ, पुष्पा आवाळे. प्रभाग ३- अविनाश आवाळे, अश्विनी माने, भाग्यश्री सावंत. प्रभाग ४- अमिता धिवार, गणेश आवाळे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00450 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..