शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान
शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान

शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान

sakal_logo
By

भोर, ता. १९ : पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना ९०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, अद्यापही १ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी त्वरित करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. इंगवली (ता. भोर) येथे रविवारी (ता. १८) राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमात नागरिकांना विविध सेवांचे वितरण केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा देव, सरपंच वंदना बांदल, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, प्रसाद सोले आदींसह तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. देशमुख यांच्या हस्ते गावातील मिळकतीवर महिलांची नावे लावलेल्या, नवीन रेशन कार्ड दिलेल्या आणि विहित नमुन्यातील पोटखराबा सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रास्ताविक केले तर महसूल नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे यांनी सूत्रसंचालन केले.

मागील दोन वर्षात महसूल विभागाकडून शेतकऱ्यांचे साडेसहा लाख फेरफार मंजूर केले आहेत. सध्या सुमारे ४५ हजार फेरफार प्रलंबीत असून पुढील सहा महिन्यात ही संख्या केवळ १ हजारांवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00452 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..