भोरच्या एसटी स्टँड संदर्भात गुरुवारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरच्या एसटी स्टँड संदर्भात गुरुवारी बैठक
भोरच्या एसटी स्टँड संदर्भात गुरुवारी बैठक

भोरच्या एसटी स्टँड संदर्भात गुरुवारी बैठक

sakal_logo
By

भोर, ता. १९ : राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगारातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २२) विशेष बैठकीचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिली. तालुक्यातील इंगवली येथील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रमानंतर रविवारी (ता. १८) ते पत्रकारांशी बोलत होते.

एसटी महामंडळाच्या भोर आगाराकडून नागरिकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही आणि एसटी स्टँडवरील समस्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये स्टँडवरील खड्डे, साफसफाई, दुर्गंधी आणि इतर समस्यांचा समावेश आहे. अनेक वेळा विनंती करूनही महामंडळाकडून अडचणी सोडवण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
मागील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी भोरच्या दौऱ्यावर आल्यानंतर नागरिकांनी याबाबत त्यांच्याकडे तक्रार केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्वरित या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी राज्य परिवहन महामंडळाचे भोर आगारप्रमुख, विभागीय व्यवस्थापक आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची गुरुवारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली आहे. भोरच्या एसटी स्टँडबाबत आणि प्रवासी सेवेबाबत काय निर्णय होतील, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00455 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..