भोरला आज महासेवा दिन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरला आज महासेवा दिन शिबिर
भोरला आज महासेवा दिन शिबिर

भोरला आज महासेवा दिन शिबिर

sakal_logo
By

भोर, ता. २० : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या निमित्त बुधवारी (ता. २१) भोरमध्ये महासेवा दिन शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. भोर शहरातील गंगोत्री मंगल कार्यालयात होणाऱ्या या महासेवा शिबीरात पाच ते सहा हजार नागरिकांना सेवा देण्याचा निर्धार तालुका प्रशासनाने केला आहे. या शिबीरात शासनाच्या महसूल, नगरविकास, ग्रामविकास, महावितरण, पोलिस, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, पोष्ट कार्यालय व राज्यपरिवहन महामंडळ या विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली सेवा देणार आहेत. मतदार यादीत नवीन नाव नोंदवणे, मतदान कार्डला आधार नोंदणी करणे, नवीन आधार आणि आधार मध्ये बदल करणे, ज्येष्ठ नागरिकांना एसटी पास देणे, आरोग्य तपासणी करणे, लंपी आजारातील जनावरांना लसीकरण करणे, विवाह नोंदणी, विद्युत जोडणी, पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी व पासपोर्ट पडताळणी करणे, कृषी साहित्य वाटप आदींसह विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले देणे इत्यादी प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00457 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..