भोर येथे येत्या रविवारी करिअर मार्गदर्शन चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर येथे येत्या रविवारी
करिअर मार्गदर्शन चर्चासत्र
भोर येथे येत्या रविवारी करिअर मार्गदर्शन चर्चासत्र

भोर येथे येत्या रविवारी करिअर मार्गदर्शन चर्चासत्र

sakal_logo
By

भोर, ता. २२ : भोर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने रविवारी (ता. २५) करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
भोर येथील प्राथमिक शिक्षक सहकार भवनमध्ये भोरमधील ओम कोचिंग क्लासेस यांच्या सहकार्याने रविवारी सकाळी दहा वाजता हा उपक्रम होणार आहे. त्यात समुपदेशक, शिक्षण तज्ज्ञ व एसएससी बोर्डाचे माजी सहायक सचिव अनिल गुंजाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे आणि परमेश्वर कोठुळे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. त्यात इयत्ता दहावी व बारावीनंतर शिक्षणाच्या असलेल्या संधी, प्रवेशाची आणि प्रवेश परीक्षेची तयारी, प्रवेश घेतल्यानंतर उच्च शिक्षणाबाबतची तयारी, स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय नोकऱ्या, व्यावसायिक याबद्दल माहिती दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न याविषयी संवाद साधण्यात येणार. भोर शहर आणि तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या चर्चासत्रात उपस्थित राहावे असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00459 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..