मॉरिशसमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉरिशसमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
मॉरिशसमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

मॉरिशसमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

sakal_logo
By

भोर, ता. ३ : येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या पुढाकारामुळे मॉरिशस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिला अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रुपन यांच्या हस्ते नुकतेच डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मॉरिशस देशातील मराठी मंडळी फेडरेशन संस्थेच्या सहकार्याने मॉरिशस युनिव्हर्सिटीमधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात उभारलेल्या पुतळ्याच्या
अनावरणप्रसंगी मॉरिशस देशाचे उपपंतप्रधान लीलादेवी डुकून, परराष्ट्रमंत्री एलन गणू, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद, मॉरिशसच्या मोका जिल्ह्याच्या कौन्सिलचे अध्यक्ष सुधीरचंद्र सूनराने, भारताच्या मॉरीशसमधील राजादूत के. नंदिनी सिंगला, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुरेश गोरेगावकर, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश कुंभार, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, बार्टीचे माजी संचालक रवींद्र चव्हाण, डॉ. वृषाली रणधीर, दिलीप ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मॉरिशस मराठी स्पिकींग असोसिएशन, भोर (पुणे) येथील अनंतराव थोपटे महाविद्यालय व मॉरिशसमधील सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ या संस्थांनी पुतळ्याच्या उभारणीसाठी सहकार्य केले. यावेळी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनच्या वतीने पत्रकार विजय जाधव, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, आबासाहेब थोरात आणि शरद गायकवाड यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.


मॉरिशसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे. त्यासाठी मॉरिशस सरकार ने जमीन द्यावी. अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग रूपन यांच्याकडे केली. येथे स्मारक आणि ग्रंथालय उभारल्यास भारत सरकारकडून मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा पाठविण्यात येईल.
- रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग

00878