भोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
भोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

भोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

sakal_logo
By

भोर, ता. १७ : येथे शनिवारी (ता. १५) वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक भीमराव शिंदे यांनी भोर शहरातील वृतपत्र विक्रेत्यांचा सत्कार केला.

यावेळी शहरातील वृत्तपत्र वितरक रमेश म्हसवडच्या कार्यालयात भीमराव शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प दिले.
सकाळच्या पुणे जिल्ह्याचे वितरण प्रमुख योगेश निगडे, तालुका बातमीदार विजय जाधव व ओम कोचिंग क्लासेसचे संचालक परमेश्वर कोठुळे यांच्या उपस्थितीत शहरातील रमेश म्हसवडे, प्रसाद शिवभक्त, अर्जुन खोपडे, स्वप्नील पैलवान, माधव शिवभक्त, उत्तम खोपडे, यशवंत शिवभक्त, बाळासाहेब देशमाने, संजय पानसरे, नंदकिशोर पानसरे या वृत्तपत्र विक्रेत्यांना यावेळी गौरविण्यात आले.