सायकलपटू डॉ. थोपटे यांना धन्वंतरी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलपटू डॉ. थोपटे यांना धन्वंतरी पुरस्कार
सायकलपटू डॉ. थोपटे यांना धन्वंतरी पुरस्कार

सायकलपटू डॉ. थोपटे यांना धन्वंतरी पुरस्कार

sakal_logo
By

भोर, ता. २५ : पुण्यातील हृदयरोगतज्ञ व आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. ओंकार थोपटे यांना तालुका मेडिकल प्रक्टीश्नर्स असोसिएशतर्फे धन्वंतरी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच भोरमधील डॉ. सुरेश गोरेगावकर यांना मॉरिशस सरकारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि पुणे ते कन्याकुमारी सायकलींग केलेले डॉ. कमलेश धुमाळ यांचाही असोसिएशच्या वतीने सन्मान करण्यात आला. धनत्रयोदशीच्या दिवशी असोसिएशतर्फे येथील सोनाला गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात धन्वंतरी पूजन करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. योगेंद्र आगटे, सचीव डॉ. आनंदा कंक, डॉ. संजय म्हेत्रे, डॉ. दीपक ताठे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अण्णासाहेब बिराजदार आदींसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी डॉक्टर्स कुटुंबीयांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्तम आरोग्यासाठी इतरांना देत असलेल्या सल्ल्याप्रमाणे डॉक्टरांनी स्वतःही व्यायामासाठी ठराविक वेळ ठेवावा, असे मत डॉ. थोपटे यांनी व्यक्त केले.

00942