भोरदरामध्ये सफरचंदाची लागवड यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरदरामध्ये सफरचंदाची लागवड यशस्वी
भोरदरामध्ये सफरचंदाची लागवड यशस्वी

भोरदरामध्ये सफरचंदाची लागवड यशस्वी

sakal_logo
By

भोर, ता. १९ : शहरातील संदीप शेटे या तरुणाने भोरदरा परिसरात सफरचंदाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. दोन वर्षात झाडांना फळे आली आहेत. बर्फ आणि थंड हवेच्या ठिकाणी पिकणाऱ्या पिकाची लागवड भोरच्या काळ्या मातीत करून भोरचे वातावरण हे सफरचंदांसाठी काही प्रमाणात अनुकूल असल्याचे सिध्द केले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

संदीप यांनी दोन वर्षांपूर्वी हिमाचलप्रदेशातील शिमला येथून हार्मोन ९९ या जातीच्या सफरचंदाची १५ रोपे आणली. यासाठी रोपे व प्रवासखर्च असा एकूण सुमारे २५ हजार रुपये खर्च केला. पंधरा बाय पंधरा अंतरावरती रोपांची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने झाडांची जोपासना केली. वडिलांच्या मदतीने सर्व झाडांना ठिबक सिंचन करून पाणी घालण्यास सुरुवात केली. एका वर्षानंतर झाडांना फुले लागण्यास सुरुवात झाली. झाडांची वाढ योग्य प्रमाणात झाली नसल्यामुळे सुरुवातीच्या फळांचा बहर घेतला नाही. दुसऱ्या वर्षी झाडाची उंची साधारणतः सात ते आठ फूट झाली. त्यानंतर जो फुलांचा बहर आला आणि फळे घेण्यास सुरुवात झाली.

सफरचंदांच्या झाडांना वर्षभरात दोनशे तास थंडी लागते. गतवर्षी झाडांना चांगल्या प्रकारे थंडी मिळाल्याने झाडांची पूर्ण वाढ झाली. याशिवाय योग्य देखभाल केल्याने यंदा उत्तम प्रकारे सफरचंद लागली आहेत. एका झाडाला १५ ते २० सफरचंद आली आहेत. यावर्षी ३ एकरांच्या जागेत सफरचंदाची शेती करण्याचे नियोजन केले आहे.
- संदीप शेटे

01017