भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीसाठी २३ जण रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीसाठी २३ जण रिंगणात
भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीसाठी २३ जण रिंगणात

भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीसाठी २३ जण रिंगणात

sakal_logo
By

भोर, ता. २२ : तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १७ जागांकरिता २३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण २८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र, सोमवारी (ता.२१) अर्जाच्या छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद झाले. सहा डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून आवश्यकता असल्यास १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

सोमवारी अर्जाच्या छाननीत काळूराम मळेकर, विजय कोंडे, शालन दानवले, शरद पडवळ आणि संदीप चक्के यांचे अर्ज बाद झाले. निवडणुकीतील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - विकास संस्था मतदारसंघ (१० जागा) : अतुल वसंत किंद्रे, विजय हनुमंत शिरवले, संपत गणपत दरेकर, विठ्ठल बाबूराव खोपडे, बबन तात्याबा जाधव, किशोर वसंतराव बांदल, बबन गोविंद गिरे, नथू रामभाऊ साळेकर, दत्तात्रेय अशोक बाठे, वसंत साहेबराव वरखडे.
इतर संस्था मतदारसंघ (१ जागा) : नरेश रमेश चव्हाण, दिलीप भिवा वरे व राजेंद्र शिवाजी सोनवणे. व्यक्ती सभासद मतदारसंघ (१ जागा) - सोमनाथ हिरालाल सोमानी व सर्जेराव तुकाराम कोंढाळकर. महिला राखीव मतदारसंघ (२ जागा) - सुजाता सुनील जेधे, शोभा मिलिंद आवाळे, मनिषा नथू बाठे व मंदा नामदेव मोरे.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ (१ जागा) : दत्तात्रेय चंद्रकांत कांबळे व मधूकर सीताराम कानडे. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ (१ जागा) - अतुल गणपत शेडगे. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ (१ जागा) ज्ञानेश्वर बाळू भोसले.