संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धेत गौरी वालगुडे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धेत गौरी वालगुडे प्रथम
संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धेत गौरी वालगुडे प्रथम

संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धेत गौरी वालगुडे प्रथम

sakal_logo
By

भोर, ता. २७ ः संविधान सप्ताहानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात घेतलेल्या संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धेत गौरी वालगुडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर, साहिल हातमकर व सृष्टी घोरपडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. भोर तालुका विधी सेवा समिती भोर यांच्यामार्फत शनिवारी (ता.२६) संविधान दिनाच्या दिवशी ही स्पर्धा घेण्यात आली. भोर न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती हर्षदा पाटील यांच्या उपस्थितीत ही पार पडली. यावेळी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष सुरेश शिंदे, सदस्या अश्विनी टोले-कुलकर्णी, अॅड शिवाजी पांगारे, अॅड शिल्पा काळे-पाटील, प्राचार्य बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य संभाजी सरवदे आदींसह शिक्षक व ४७४ विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना न्यायाधीश हर्षदा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक दिली. पुस्तके, डायरी व पेन, असे या बक्षीसांचे स्वरूप आहे. न्यायाधीश हर्षदा पाटील व वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व भोर तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन केले आहे.